पुणे: राज्यात कोरोना लसीकरणात पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 90 लाख लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा परिणाम मर्यादित राहील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात एकुण 78 लाख 87 हजार 874 नोंदणीकृत मतदार आहेत. मात्र, लसीकरण करून घेणाऱ्या लोकांची संख्या 90 लाख इतकी भरली. शनिवारी दिवसभरात पुण्यात 1 लाख 56 हजार 620 जणांना लस टोचण्यात आली.

कोरोनामुळे पुण्यातील गणेशोत्सावावर निर्बंध
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले होते. मिरवणुका आणि मंडपात गर्दी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक गणपतींचे दर्शन ऑनलाईन करण्यात आले होते.

अधिक वाचा  'राष्ट्रवादी' चा 'राष्ट्रवादी'नेच केला करेक्ट कार्यक्रम; आमदार शिंदे यांना दुहेरी झटका

महाराष्ट्राचा विक्रम, एकाच दिवसात 14.39 लाख नागरिकांना टोचली लस

महाराष्ट्राने 8 सप्टेंबरला लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला होता. एकाच दिवसात १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली होती. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी ५५ लाख २० हजार ५६० लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख ७८ हजार ८०५ जणांना दुसऱ्या लसीची मात्रा देऊन त्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

दरम्यान, लसीकरण मोहिमेला राज्यात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषदेमध्ये तज्ज्ञांनी देखील लसीकरणावर विशेष भर देण्याची गरज अधोरेखित केली असून त्यापूर्वीपासूनच राज्य शासनाने लसीकरणाला गती दिली आहे.

अधिक वाचा  पुणे ZP नवीन प्रारूप- रचना निश्चित; फेररचनेत आमदारांची लुडबूड

लसीकरणावर एक दृष्टिक्षेप –

● १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : ४८.४६%

● १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : ३७.८८%

● ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : ५२.२४%

दैनंदिन लसीकरण

● २१ ऑगस्ट – ११,०४,४६५

● ३० ऑगस्ट – १०,३५,४१३

● १ सप्टेंबर – ९,७९,५४०

● ४ सप्टेंबर – १२,२७,२२४