बारामती लोकसभा मतदार संघातील बावधन भागातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासूचनेनुसार आज सोसायट्यांचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक, पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला विधासनभा मतदार संघ अध्यक्ष कुणाल वेडे-पाटील, महावितरणचे शिवाजीनगर परिमंडळाचे कार्यकारी अभियंता श्री राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री पाटील, सहायक अभियंता श्री वाघमारे तसेच बावधन येथील सुमारे 30 ते 3५ सोसायट्यांचे अध्यक्ष, आणि सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

अधिक वाचा  अवलियाचा जन्मदिनी भीमसंकल्प! चिन्हरुपी भस्मासुराचा वध!

या भागात वारंवार वीज खंडित होणे व अन्य समस्या आहेत. याबाबत गणेश खिंड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता श्री तगडपल्लीवर यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले. त्यानंतर या भागातील सर्व समस्यांचा एक सर्वंकष आराखडा तयार करून पुढील सहा महिन्यात सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.