बावधन मार्केट यार्ड, बावधन टाईम्स, पुणे मैत्रिण मंच, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाच्या योजना , कोविंड 19 मध्ये 2020 शेतकरी ते नागरिक ग्राहक हा उपक्रम राबवून 900 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करून देत1220 टन (12.20,000 Kg.) शेतमाल 1,70,00,000/- (एक कोटी सत्तर लाख) किंमतींचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते GRD Farmers Producer Co. Ltd. चे मुख्य संचालक गोरख रावसाहेब दगडे यांना कृषी पर्यावरण मित्र पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे. चे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

या कामाच्या अनुभवातून बावधन मार्केट यार्डची निर्मिती करुन 131 गाळे तयार केले यातून सुमारे 150 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत राखीव गाळे उपलब्ध करुन देणारे बावधन मार्केट यार्ड हे देशातील पहिलेच मार्केट ठरले आहे, GRD FARMERS PRODUCER CO. LTD. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सुरु झालेले हे देशातील पहिलेच मार्केट ठरले आहे. केंद्र शासनाच्या कृषी धोरणाची सक्रिय अंमलबजावणी करून आपण आदर्श घालून दिलात. आपल्या या चौफेर कार्याची दखल घेऊन आपणास कृषी पर्यावरण मित्र हा पुरस्कार महामहीम राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

गोरख रावसाहेब दगडे यांची ही प्रतक्रिया-

होय तुमच्यामुळेच……

मला महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते कृषि पर्यावरण मित्र पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासाठी माझे नाव पुकारले गेले आणि मानपत्र वाचन केले गेले आणि सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज माझ्यासाठी टाळ्या वाजत होत्या त्यापण राजभवनात. कोविड १९ काळापासून सुरु केलेल्या कृषि विषयक सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला. शेतकरी बांधवांसाठी मोफत सेवा देणारे आपले बावधन मार्केट यार्ड च्या उभारणीसाठी ज्या असंख्य हातांची साथ मिळाली त्यांचे ॠण मी नेहमीच मानतो.

याची सुरुवात होते ती गिरीशभाऊ बापट खासदार पुणे यांच्यापासुन…. माझे आईवडील, पत्नी, भाऊ, कुटूंब, शेतकरी, विक्रेते, ग्राहक (नागरिक), माझे सहकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, ग्रामस्थ, नेहमी सहकार्य करणारे जेष्ठ सल्लागार, हितचिंतक, नातेवाईक, काॅन्ट्रॅक्टर्स, माल पुरवठादार, भाजप पक्षातील माझे नेते, कार्यकर्ते मित्र, मी संपादक असलेला बावधन टाईम्स वृत्तपत्र सहकारी, मी संस्थापक असलेला पुणे मैत्रीण मंच, श्रीराम उद्योगसमूह, आणि पुर्तता होते ती श्री. बाळासाहेब गुलाबराव दगडे यांच्या कुटूंबाकडून…. यातला प्रत्येक दुवा हा महत्वाचा.
या पुरस्काराने यापुढील नवनवीन शेतकरी मार्केटची उभारणी करण्याकामी उर्जा मला प्राप्त झाली. आगामी काळात गरजवंतांना दोन हजारपेक्षा जास्त व्यवसाय उभारणी करुन देण्यासाठी मी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने कार्यरत राहणार आहे. यापुढील घोडदौड दुप्पट वेगाने सुरु राहील.