पुणे : मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो. मात्र उंड्री इथे पहिल्या महिला सरपंच शारदा मोहनराव होले यांच्या पार्थिवाला मुलींनी खांदा देऊन आदर्श घालून दिला.

उंड्री येथील प्रसिद्ध महिला उद्योजक, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, शारदा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा तसेच उंड्री गावच्या प्रथम महिला सरपंच शारदा मोहनराव होले यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

आईच्या पार्थिवाला लेकींचा खांदा
वंशाचा दिवा मुलगाच हा समज दूर करत या दोन मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या दोन लेकींनी भासू दिली नाही. त्यांनी आपल्या परिवाराप्रामणे नागरिकांची सेवा केली आहे. आज त्यांचे नाव उंड्री परिसरात अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्याला मोठे दु:ख झाल्याचे राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुण्यातील अभिनेत्री आर्या घारेने चक्क स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...

या दु:खद प्रसंगी हजारो ग्रामस्थांनी तसेच समाजातील राजकीय नेते, व्यावसायिक,उद्योजक आणि इतर नागरिकांनी अनुभवला. शारदा होले यांच्या पश्चात पती, दोन मुली,जावई, दीर, जावा, पुतणे, नातू , आदी मोठा परिवार आहे.

आईच्या पार्थिवाला लेकींचा खांदा

वंशाचा दिवा मुलगाच हा समज दूर करत या दोन मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या दोन लेकींनी भासू दिली नाही. त्यांनी आपल्या परिवाराप्रामणे नागरिकांची सेवा केली आहे. आज त्यांचे नाव उंड्री परिसरात अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्याला मोठे दु:ख झाल्याचे राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

गडचिरोलीतही लेकींकडून अंत्यसंस्कार
अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच लेकींनी साश्रू नयनांनी खांदा दिला. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला. मुलगा नसल्यामुळे पाच मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंतिम संस्कार केले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या पाच लेकींनी भासू दिली नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील रहिवासी अण्णाजी रामचंद्र पाकलवार यांच्या पत्नी निर्मला पाकलवार यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकलवार यांना 5 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.

अधिक वाचा  मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे : जयकुमार गोरे जिल्हा न्यायालयात शरण

लवार यांना 5 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.