पुणे : पुणे जिल्ह्यातील शेवाळेवाडी गावातील भाजपा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांच्या घरी सालाबादप्रमाणे परिवारातील सर्व सदस्य एकत्र मिळून गणरायाची प्रतिष्ठापना करतात.राहुलदादा शेवाळे यांच्या घरची गणपतीची मूर्ती मनमोहक स्वरूपाची आहे. पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती आणि हळदी-कुंकवापासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीच्या भोवती आकर्षक अश्या विविध फुलांचा वापर करून परंपरिक सजावट यावेळी करण्यात आली आहे.

गणपतीची मनोभावे आराधना संपूर्ण शेवाळे परिवाराकडून एकत्र येऊन केल्याने घरामध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे भाजपा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांनी न्युजमेकर.लाईव्ह च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली.

अधिक वाचा  लसीकरण नाही तर, मद्यही मिळणार नाही

कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवणारी सजावट करू नका.थर्माकॉलचा वापर कटाक्षानं टाळून घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कल्पकतेनं नाविन्यपूर्ण सजावट करून मूर्तीचे विसर्जन घरीच करावे.नागरिकांनी कोरोंना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारी व जबाबदारीचे भान ठेऊन गणेशोत्सव प्रत्येकाने साजरा करताना मास्कचा वापर करत प्रशासनाचे नियम पाळा व अटींचे पालन प्रत्येकाने करावे,असे आवाहन भाजपा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांनी करताना गणपती रायाने संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व जनतेला आशिर्वाद देवो आणि कोरोना या देशांतूनच नाही तर संपूर्ण जगातूनच नाहीसा होवू द्या,अशी प्रार्थना करून आशीर्वाद मागितला.