पुणे : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली अटल आरोग्य रथ यात्रा हवेली तालुक्यातील हांडेवाडी या गावात आली.समस्त ग्रामस्थांच्या वतीने अटल आरोग्य रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी हांडेवाडी गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार कार्यक्रम मोठया उत्स्फूर्त वातावरणमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे क्रीडा समितीचे अध्यक्ष व नगरसेवक अजयभाऊ खेडेकर याच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा डॉ. तेजस्विनी अरविंद ,
हवेली तालुका भारतीय जनता पार्टी महिला समितीच्या अध्यक्षा वैशाली पवार, माजी सरपंच अशोक नाव्हाले, सदस्या वर्षा माढेकर,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन हांडे,उंड्री गावचे युवानेते राजेंद्र भिंताडे,भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका उपाध्यक्ष पप्पूशेठ जाधव, युवा मोर्चा चे उपाध्यक्ष सुरज बिरे, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पांडुरंग रोडे, दादासाहेब कड, माऊली हांडे, शरदभाऊ हांडे, केशर हांडे, उत्तमराव सोनावणे, स्वप्नील हांडे, राजेंद्र शेवाळे, राहुल भाडेकर, रुपाली कवडे, सुनीता दुकळे, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन युवा नेते सचिनभाऊ हांडे यांनी केले.

अधिक वाचा  Omicronच्या प्रचंड धास्तीत; WHO कडून माहिती