बंगळुरू: लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, स्वयंवर आपण ऐकलं आहे. लव्ह मॅरेजमध्ये तरुण-तरुणी एकमेकांना पसंत करतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग कुटुंबाच्या परवानगीने लग्न करतात. अरेंज मॅरेजमध्ये पाहण्याचा कार्यक्रम होतो. कुंटुबाने निवडलेला मुलगा किंवा मुलगी एकमेकांना पाहतात आणि मग लग्न करतात. स्वयंवरमध्ये समोर असलेल्या किती तरी जणांमधून एकाचा जोडीदार म्हणून निवड करण्याची मुभा असते.

पण कधी टॉस करून जोडीदार निवडल्याचं ऐकलं आहे का? आयुष्याचा जोडीदार निवडण्यात टॉस केला म्हणजे आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. पण कर्नाटकमध्ये लग्नासाठी असा टॉस झाला. दोन तरुणी एकाच तरुणासाठी भिडल्या. त्या दोघींनाही त्या तरुणाशीच लग्न करायचं होतं. अखेर ग्रामस्थांनी टॉस करून लग्न करून देण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  स्थानिक स्वराज्य संस्था: ओबीसी जागांच्या निवडणुका ही स्थगित - राज्य निवडणूक

अलुर तालुक्यातील एका गावातील तरुणाचं दोन तरुणींसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा तरुणासमोर मोठं संकट उभं राहिलं. तरुणाचं लग्न ठरताच दोन्ही तरुणी तिथं पोहोचल्या आणि दोघींनी आपणच याच्यासोबत लग्न करणार असं सांगितलं. दोघीही एका तरुणीसाठी भिडल्या.

ग्रामस्थांनी सुरुवातीला या तरुणींना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघींपैकी एकही जण ऐकायला तयार नाही. एका तरुणीने आत्महत्येचाही प्रयत्न केला. अखेर ग्रामस्थांनी टॉस करण्याचा निर्णय घेतला. तरुणाचं लग्न दोन तरुणींपैकी कुणासोबत होणार याचा निर्णय टॉस ठरवणार, असं त्यांनी सांगितलं.

झी न्यूजच्या वृत्तानुसार एका बाँड पेपर तिघांची सही करून जो निर्णय असेल तो मानावा लागेल, अशी अट टॉसआधी ठेवण्यात आली. जेव्हा टॉस करण्याची वेळ आली तेव्हा तरुणाने आपली इच्छा जाहीर केली. त्याला नेमकं कुणाशी लग्न करायचं आहे ते त्याने सांगितलं. ज्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला तिला त्याने मिठी मारली. मग दुसरी तरुणी संतप्त झाली आणि तिने त्याच्या कानशिलात लगावली. अखेर तरुणाचं लग्न कुणासोबत होणार हे ठरलं आणि टॉस करण्याची वेळच आली नाही.