पुणे : भारतरत्न डॉ. ए पी जी अब्दुल कलाम हे नव्या संधी आणि तंत्रज्ञानाचे प्रेरक असून देशात नवनवीन तंत्रज्ञान येण्यासाठी आयुष्याची पराकाष्टा करण्यात धन्यता मानणारे व्यक्तिमत्व होते; त्यांच्या नावाने आणि त्यांच्या कार्याच्या आढावा घेणारा हा ई लार्गिन स्कूलचा प्रोजेक्ट माझ्यासाठी अभिमानस्पद असून नव्या पिढीला त्यांचे कार्य कायमची प्रेरक राहील असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर खा. वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे नगरसेवक दीपक मानकर बाबुराव चांदेरे विरोधी पक्ष नेत्या दीपालीताई धुमाळ स्थानिक नगरसेवक दिलीप बराटे, सायली ताई वांजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत हा संपन्न झाला. हजारो हितचिंतकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सोहळ्यास उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी नगरसेविका सौ.लक्ष्मीताई दुधाणे व स्वप्नील दुधाने अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  भ्रष्टाचारमुक्त अन् पारदर्शक राजकारणास आम आदमीच पर्याय ; कृष्णा गायकवाड यांचे पत्राद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे एक अनोखे व्यक्तिमत्व संरक्षण मंत्री असल्यापासून ते सलग दहा वर्ष कृषिमंत्री असताना माझ्या मैत्रीचे व्यक्तिमत्व असून माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या विषयी एक स्वतंत्र आठवणींचा कप्पा असून अशा नवतंत्रज्ञानाला अर्पण केलेल्या व्यक्तीच्या नावाने पुणे महापालिकेची एक वास्तू उभा राहिली आणि त्यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने त्यांच्या संपूर्ण क्षेपणास्त्रांचा उल्लेख वर्गखोल्यांची नावे देताना केल्याने त्यांचे कार्य कायमच स्मरणात राहील. देशात सध्या पुणे बेंगलोर आणि हैदराबाद या नव्या तंत्रज्ञानाच्या आणि व्यवसायाच्या तीन शहरांचा उल्लेख कायम केला जात असून यापुढील काळात याच तंत्रज्ञानाच वर सर्व नोकरी-व्यवसाय अवलंबून राहण्याची शक्यता आहे; यामुळे या भागातील सामान्य नागरिकांची मुले या नवंतंत्रज्ञानाने अवगत करण्याचे स्तुत्य कार्य लक्ष्मी दुधाणे यांनी केले असून आपल्या परिसरातील किंवा नातेवाइकांची नावे वास्तूला देण्यापेक्षा  ऋषितुल्य व्यक्तीमत्वाच्या कार्याचा केलेला गौरव माझ्या कायम स्मरणात राहील आणि हे मला अभिमानास्पद आहे. असेही शरद पवार यांनी उद्घाटनाच्या भाषणावेळी सांगितले.

उद्घाटन वृत्त/ ई लर्निंग स्कूलची सविस्तर माहिती वाचा-  https://www.newsmaker.live/archives/51202

अधिक वाचा  करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींची बैठक

पुणे शहरातील लोकांनी दिलेल्या संधीचा लोकांसाठीच वापर करण्याच्या भूमिकेतून कर्वेनगर भागात गेली दहा वर्षे सातत्याने अविरत काम करत असून कोणताही अविर्भाव किंवा डामडौल न करता जनहितार्थ काम करत असून साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोचवत प्रगती साधण्यासाठीच गेली दहा वर्ष काम करत असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजिका दुधाणे यांनी सांगितले. तर कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाणे यांनी कोथरूड मधील सर्व प्रभागांमध्ये एक अनोखा आणि वेगळा प्रभाग बनवण्याचा संकल्प गेली दहा वर्षे आम्ही करत असून स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या सोडवत असताना एक विचार पोहोचवण्यासाठी काम करत आहे असे सांगितले.

– अशी असेल शाळेची भव्यता –

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कुल इमारतीला संपूर्ण सिमाभिंत व ६ मीटरचे स्वतंत्र प्रवेशव्दार.

छोटा गट ते ७ वी पर्यंत प्रत्येकी एक वर्ग (९ वर्ग)

प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, स्टाफ रूम, वैद्यकिय रूम, इनडोअर खेळणी, खेळासाठीचे साहित्य व डिजीटल व्हर्म्युअल इ. (स्वतंत्र ११ खोल्या) एकूण २० खोल्या

अधिक वाचा  भारताच्या २५० धावा पूर्ण; श्रेयस आणि जडेजाची शतकी भागीदारी

शाळा स्टाफ, अपंगासाठी, मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय.

भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणेने वर्गखोल्यांना क्षेपणास्त्रांची नावे

प्रशस्त मैदान- (कबडडी, खो- खो, क्रीकेट, बास्केट बॉल, फुलबॉल खेळ)

वर्ग खोल्यामध्ये बेंचेस, ब्लॅकबोर्ड, टेबल, खुर्ची, लहान मुलांना आकर्षित बैठक व्यवस्था.

ई-लर्निंग स्कूल मध्ये संगणक, प्रोजेक्टर व प्रिंटर या सुविधा.

विद्युत बॅकअपसाठी ६२.५० के. व्ही. जनरेटरची सोय

शाळेलगत ऑक्टोगोनल(autogonel) प्रकाश व्यवस्था.

सिमाभिंत जॉगींग ट्रॅक च्या लगत ७० देशी वृक्षांची लागवड.

१८०० चौ.मी. इमारतीचा तळ मजला ६००० चौ.मी. मुलांना खेळण्यास मैदान शाळा

इमारतीच्या पुढील बाजूस ९ मी. कॉक्रीट रस्ता व इतर तीनही बाजूने ६ मी. कॉक्रीट रस्ते

प्रकल्पाचा उददेश :

वारजे कर्वेनगर परिसरातील मुलांना या शाळेमुळे अद्ययावत शाळेची वास्तु मिळणार

शाळेमध्ये मुलांना खेळण्याच्या मैदानापासून ते संगणकापर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर कौशल्य प्राप्तीस आवश्यक अद्ययावत इमारत