पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्या वस्त्यांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार करत सुरू असलेली अटल आरोग्य रथ हवेली तालुक्यात दाखल झाली आहे. हवेली तालुक्यात सोळा दिवस अटल आरोग्य रथ नागरिकांच्या दारी जाणार आहे. पुरंदर आणि हवेली तालुका पूर्णतः आरोग्यमुक्त करण्यासाठी या रथ यात्रेचे आयोजन केले आहे.साधारण पस्तीस हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करत प्रत्येकला मोफत औषधोपचार देण्यात आले असल्याची माहिती अटल आरोग्य रथ आयोजक तथा आरोग्य दुत, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे यांनी दिली.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या गावात मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीराचे उद्घाटन आणि अटल आरोग्य रथाचे स्वागत नगरसेविका अश्विनी पोकळे व पंचायत समितीचे सदस्य राजीव भाडळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उद्योगपती नाना बाजारे, रमेश विधाते, हवेली भाजपा अध्यक्ष धनंजय कामठे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन हांडे, किशोर पोकळे, उपाध्यक्ष सूरज बिरे, सूरज परदेशी, राजेंद्र शेवाळे, सुजित मोडक, उपाध्यक्ष अंकुश जाधव, सनी शेवाळे, राजेंद्र पवार, सोमनाथ कऱ्हे, महेश भाडळे, निखिल बाजारे, कावेरी वाल्हेकर, डिंपल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल शेवाळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमास
तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पुढेही अशाच सामाजीक उपक्रमातुन जनतेची सेवा त्यांनी करत रहावी.आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत अशा शुभेच्छा या प्रसंगी नगरसेविका अश्विनी ताई पोकळे यांनी दिल्या.

अधिक वाचा  LPG सिलेंडर स्वस्त ची अपेक्षाभंग; पुन्हा १०० रुपयांनी महाग

कार्यक्रमाचे संयोजन भाजपा सरचिटणीस पांडुरंग रोडे आणि महिला अध्यक्ष वैशाली पवार यांनी केले . यावेळी कोरोनाचे नियम व अटींचे पालन करून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.