उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी हांडे रोड-सातवनगरमधील नागरिकांची प्रचंड गर्दी

पुणे : भाजप ओबीसी सेलचे हडपसर विधानसभा अध्यक्ष जनसेवक संजयअण्णा सातव व भारतीय टपाल विभाग पुणे पूर्व यांच्या वतीने शासन आपल्या दारी शिबिराचे भव्य आयोजन हंडेवाडी रोड जनसंपर्क कार्यलयात आज करण्यात आले.
यावेळी भाजप विधानसभा संघटक गणेश घुले,भाजप नेते विकास भुजबळ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धर्मराज म्हेत्रे,नाईक काका,पोपट वाडकर,स्मिता गायकवाड, शोभा लगड,डॉ मंगेश वाघ,सुफियांन खान,बाळासाहेब घुले,ऍड अनुप अवस्थी, यांच्यासह विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व महिला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

विविध जीवणावश्यक शासकीय प्रमाणपत्रे आणि पोस्ट ऑफिसच्या कल्याणकारी योजना यांचा लाभ देण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिरामुळे हजारो नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी मान्यवर आणि नागरीकांनी व्यक्त करत संजय अण्णा सातव यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा  सुतार दवाखान्यातील गैरसोयी थांबवा - संजय काळे

कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते अभिजित सातव,भाजप महिला नेत्या सविताताई सातव,संदीप नलवडे,संकेत सोनवणे,बापू मिरेकर,संजय भुजबळ,फरदिन भिस्ती,आणि संजयअण्णा सातव मित्रपरिवार व गेनूजी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.