पुणे : पुणे शहरातील लोकांनी दिलेल्या संधीचा लोकांसाठीच वापर करण्याच्या जनसेवेसाठी या भूमिकेतून कर्वेनगर भागात गेली दहा वर्षे सातत्याने नगरसेविका लक्ष्मीवहिनी दुधाणे या अविरत काम करत असून कोणताही अविर्भाव किंवा डामडौल न करता जनहितार्थ सदैव तत्पर नेतृत्व म्हणून काम केले जात असून भूमिकेचा परिपाक म्हणून दुधाणे वाहिनींनी जनआशीर्वादाला अर्पित स्तुत कार्य केले असून भारत रत्न डॉ. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कुल चे देशाचे मा. कृषिमंत्री मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, मा. खा. वंदनाताई चव्हाण, मा. महापौर श्री. मुरलीधर मोहोळजी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष श्री. प्रशांतदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

अधिक वाचा  गावातील इंग्रजी बोलणारे पहिले व्यक्ती ते उपराष्ट्रपती; जगदीप धनखड यांचा प्रवास

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून हित चिंतकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सोहळ्यास उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सौ.लक्ष्मीताई दुधानेन गरसेविका, पुणे मनपा व स्वप्नील दुधाने अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कामाचे संक्षिप्त वर्णन

कर्वेनगर येथील प्रभाग क्र. ३१ (ब) १०० फुटी डि.पी. रोड लगत शाळेच्या आरक्षीत जागेवर पुणे महानगरपालिके तर्फे भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कुल बांधण्यात आलेले आहे.

शाळा इमारतीला संपूर्ण सिमाभिंत व ६ मीटरचे स्वतंत्र प्रवेशव्दार.

छोटा गट ते ७ वी पर्यंत प्रत्येकी एक वर्ग (९ वर्ग)

अधिक वाचा  संभाव्य खातेवाटप कसं असेल? कोणाला कोणती खाती.... जाणून घ्या

प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, स्टाफ रूम, वैद्यकिय रूम, इनडोअर खेळणी, खेळासाठीचे साहित्य व डिजीटल व्हर्म्युअल इ. (स्वतंत्र ११ खोल्या) इमारतीमध्ये एकूण २० खोल्या

शाळा स्टाफ, अपंगासाठी, मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय.

भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी या हेतूने वर्गखोल्यांना विविध आयुधांची (क्षेपणास्त्रांची) नावे.

प्रशस्त मैदान- कबडडी, खो खो, क्रीकेट, बास्केट बॉल, फुलबॉल खेळ खेळता येतील.

वर्ग खोल्यामध्ये बेंचेस, ब्लॅकबोर्ड, टेबल, खुर्ची, लहान मुलांना आकर्षित बैठक व्यवस्था.

ई-लर्निंग स्कूल मध्ये संगणक, प्रोजेक्टर व प्रिंटर या सुविधा.

विद्युत बॅकअपसाठी ६२.५० के. व्ही. जनरेटरची सोय

अधिक वाचा  मल्याळम चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मराठी चित्रपटांना मिळत नाही- महेश मांजरेकर

शाळेच्या इमारती लगत ऑक्टो गोनल प्रकाश व्यवस्था.

सिमाभिंती लगत जॉगींग ट्रॅक च्या लगत ७० देशी वृक्षांची लागवड.

१८०० चौ.मी. इमारतीचा तळ मजला ६००० चौ.मी. मुलांना खेळण्यास मैदान शाळा

इमारतीच्या पुढील बाजूस ९ मी. कॉक्रीट रस्ता व इतर तीनही बाजूने ६ मी. कॉक्रीट रस्ते

प्रकल्पाचा उददेश :

या शाळेमुळे वारजे कर्वेनगर परिसरातील मुलांना अद्ययावत शाळेची वास्तु मिळणार आहे. ज्या शाळेमध्ये मुलांना खेळण्याच्या मैदानापासून ते संगणकापर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कौशल्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणारी अद्ययावत इमारत पुणे मनपा मार्फत उपलब्ध करण्यात आलेली आहे.

Comments are closed.