नवी दिल्ली : भाजपच्या माजी आमदार व भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांनी राज्यातील विशेषत: पुण्यातील करोनाच्या परिस्थितीचीही माहिती दिली.

करोनाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना मदत करण्यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती कुलकर्णी यांनी मोदींकडे केली. या विधवांना एकरकमी पाच लाख रुपये वा दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन दिली जाऊ शकते, असा मुद्दा त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडला. पुण्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी मोदींना निवेदन दिले. मेधा कुलकर्णी यांनी संघटना महासचिव बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली.