मुंबई : हिंदवी स्वराज्य संघटनेच्या आठव्या वर्धापनदिना निमित्त आयोजित ”मी मराठी-महाराष्ट्र गौरव” पुरस्कार समारंभ रविवारी दि २९ ऑगस्ट २०२१ रोजी पत्रकार भवन मुबंई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उद्दघाटक मा.विद्याताई चव्हाण (माझी आमदार), विशेष अतिथी मा. जुई गडकरी (प्रसिध्द सिने-नाट्य अभिनेत्री ), समारंभाध्यक्ष मा.डॉ.प्रवीण नीचत (होप फाउंडेशन अध्यक्ष ), स्वागत अध्यक्ष मा. राज पाटेकर (चित्रपट निर्माते व उद्योजक), विशेष अतिथी मा.आरती साळवी (सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त), प्रमुख उपस्थिती मा.संगीता गुरव (उद्योजिका ), मा.विनोद हिवाळे (संकल्प संस्था अध्यक्ष), मा.वासुदेव पाटील (समाजसेवक), मा.विशाल हिवाळे (युवा क्रांती सभेचे अध्यक्ष), मा.शमिका दळवी (आत्मनिर्भर फाउंडेशन अध्यक्ष), निमंत्रक मा.प्रकाश जाधव (हिंदवी स्वराज्य संघटना अध्यक्ष), संयोजक मा. सुरज भोईर (हिंदवी स्वराज्य संघटना सचिव) या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

अधिक वाचा  IND vs NZ: भारतीय संघाचा मुंबई कसोटीत विजयी डंका

कार्यक्रमाची सुरवात उपस्थित सर्व पाहुण्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोस पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दयानंद जाधव सर व ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार तसेच कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सचिव सुरज भोईर यांनी जयंत पवार यांना स्वरश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी “गिरणी ही शान होती ही मुंबई ची आई” ही रचना सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्याचसोबत कुमारी श्रुती लक्ष्मण हेंडवे या ११ वर्षीय मुलीने मायबाप या विषयावर विदर्भातील वऱ्हाडी भाषेत खूप छान प्रकारे कविता सादर केली, या कवितेला उपस्थिती पाहुणे आणि रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अधिक वाचा  पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का नाही? - अमोल कोल्हे

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि निवेदन संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतल्या समाजसेवक कलावंत, खेळाडू, वकील, डॉक्टर या व्यक्तीना त्यांनी केलेल्या कार्यक्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य म्हणून मा.विद्याताई चव्हाण आणि मा.जुई गडकरी यांच्या हस्ते ”मी मराठी -महाराष्ट्र गौरव” पुरस्कार २०२१ गौरव चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात मा.सुरज भोईर यांनी फार प्रभावशाली सूत्रसंचालन केले, विशेष सहकार्य सविता हेंडवे, नजमा शेख आणि कपिल क्षिरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाची सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.