पुणे वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार बेकायदेशीर आरागिरणी जुना मुंढवा रोड, तुकाराम नगर, खराडी, येथे सुरु असल्याचे पुणे वनविभागास समजले. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक, पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ व इतर वनकर्मचारी यांनी बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या आरागिरणी ( Saw mills ) वरती पुणे वनविभागामार्फत कारवाई करण्यात आली.

सदरची कार्यवाही ही राहुल पाटील, (भा.व.से.), उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली आशुतोष शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक, मयूर बोठे, सहाय्यक वनसंरक्षक, व मुकेश सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे, हनुमंत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ, तसेच पुणे, वडगाव मावळ, शिरोता व पौड वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी व स्थानिक पोलीस प्रशासन यांचे सहकार्याने पार पडली.

अधिक वाचा  Omicronच्या प्रचंड धास्तीत; WHO कडून माहिती