मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ‘अशक्यप्राय’ वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

अधिक वाचा  गोयलगंगा ग्रुप वर शासन फसवणूकीचा गुन्हा दाखल

पृथ्वीराज चव्हाण, फडणवीसांचे प्रयत्न अयशस्वी
यापूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात ते यशस्वी झाले नव्हते. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी करुन दाखवलं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाची मदत केल्याचं सांगण्यात येत आहे.

सचिवांपेक्षा अधिकारी पॉवरफुल्ल

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एकाच कक्षात वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी ‘पॉवरफुल्ल’ बनले होते. कोणताही कॅबिनेट सदस्या त्यांचं काही ‘वाकडं’ करु शकत नव्हता. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मग विचारमंथन करुन, या 300 अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली”

अधिक वाचा  बिंधुमाधव ठाकरे दवाखान्यात मयत पास केंद्र सूरू करा- मनसे

आम्हाला आशा आहे की गेल्या दोन दिवसात जारी केलेले सर्व हस्तांतरण आणि पदोन्नती आदेश लागू केले जातील. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागासाठी ही खरी कसोटीची वेळ असेल, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.