ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्याकडून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता यांची तीन बोटे छाटली गेलीत. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे जावून कल्पिता यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना धीर देत लवकर बरे व्हा, असे सांगितले.
कल्पिता पिंपळे या फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती स्थिर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचे आम्ही बघतो, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कल्पिता पिंपळे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकर यांनी फेरीवाल्यांना पुन्हा दिला आहे.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

दरम्यान, आपण कर्तव्य बजावतच राहणार हल्ल्यांना घाबरणार नाही, असा ठाम निर्धार, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी बोलताना व्यक्त केला. सोमवारी संध्याकाळी कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करताना, एका फेरीवाल्यानं कल्पिता पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात पिंपळे यांच्या हाताची तीन बोटं तुटली.

त्याआधी काल राज ठाकरे यांनी तो जेलमधून बाहेर येवू दे. मग हल्ला काय असतो ते दिसेल असा इशारा दिला आहे. आता मुजोर फेरीवाल्यांविरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात महिला अधिका-यावर हल्ला करणारा पोलिसांकडून सुटला की मनसेचा मार खाणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.