पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ सबका विकास’ या  विचाराने प्रेरित होऊन खडकवासला विधानसभा मतदार संघाचे हॅट्रिक आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी आपली साधी राहणी मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि भेटेल त्याला शक्य तेवढे सहकार्य करण्याच्या भूमिकेने आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात घराघरांमध्ये संपर्क निर्माण केला आहे. हाकेला ओ! ……. अन् मदतीला हात! या शुद्ध आणि सात्विक विचाराने आज खडकवासला मतदारसंघात भीमराव अण्णा तापकीर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून अत्यंत दुर्लक्षित समाजाच्या मनामनात पोहोचत hattrick आमदार! network दमदार; ही बिरुदावली मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. सलग तीन वेळा मतदारांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाला बांधील राहून देशभरात वाहत असलेली विकासगंगा घराघरापर्यंत पोहोचत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात विकासाकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी केंद्र व राज्याकडून मिळतो आहे. गेल्या पंधरा ते बीस वर्षांत रखडलेला विकास मार्गी लावत आहेत.

खडकवासला विधानसभा महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात मतदारसंघातील चांदणी चौकातील ते वेल्हे, खानापूर ते पानशेत व खेड दुमजली उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी शिवापूर ते सिंहगड पायथा हे तीन रस्ते शासनाने नुकताच १८६ कोटी रुपयांचा आहेत. निधी मंजूर केला असून, हा निधी प्रदेशाध्यक्ष व माजी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मिळून मतदारसंघाचा विकास करण्याचे काम केले.

चांदणी चौक बहुमजली उड्डाणपुल, स्वारगेट ते कात्रज मेट्रोस मंजुरी कात्रज उड्डाणपुलासाठी निधीची तरतूदही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करण्यात आल्याने हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खडकवासला मतदार संघातील सर्वच नागरिकांना अभिमानास्पद वाटण्यास वाव असल्याचेही आमदार तापकीर यांचे मत आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील अपूर्ण रस्ता, सिंहगड रस्त्यावरील नित्याची वाहतूककोंडी यामुळे वाहनचालकासह स्थानिक नागरिकांना प्रसाद देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने नव्याने बहुमजली उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच पाठपुरावा करून, चांदणी चौक ते कात्रज आणि डेक्कन जिमखाना ते खडकवासला मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यासाठी आग्रही असून, लवकरच या मागांचा डीपीआर करण्यास मंजुरी मिळेल.

अधिक वाचा  मला विरोधी पक्षनेते व्हायचं होते, परंतु मी स्वतःही पाठींबा दिला...! राष्ट्रवादीतही नाराजीनाट्य?

खडकवासला मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास १८ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून त्यास निधीही मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम तसेच ग्रामविकास विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून, ती कामे वेगाने सुरू आहेत. कात्रज मुख्य चौक ते नवले पुलापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी पाठपुरावा सुरु असून निधी उपलब्ध झाल्यावर या कामासही गती येईल. अशा प्रकारे खडकवासला मतदारसंघात जास्तीत जास्त लोकोपयोगी दीर्घ काळ टिकणाऱ्या विकासकामांवर भर असून यामध्ये राज्य सरकारचा मोलाचा वाटा आहे. विशेषत: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचे स्वप्न मी प्रत्यक्षात उतरवीत आहे.

अधिक वाचा  चार सदस्यीय प्रभाग रचना बदलाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक निधी १३५ कोटी निधी

विधानसभा मतदारसंघातील राज्य महामार्ग व जिल्हा मार्ग विकसनासाठी राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प एलयूटी अंतर्गत १३५ कोटीची तरतूद राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प खडकवासला मतदार संघातील राज्य व जिल्हा मार्ग रस्त्यासाठी १३५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहगडसारख्या ऐतिहासिक किल्ला व परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्ते विकसनाला मोठी गती मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमानात बदल होणास लाभदायक आहे. १० वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न राहणार नाही.

पशुवैद्यकीय चिकित्सालयात औषधांचा गैरव्यवहार

पुणे, औंध येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात औषधांची मुदत संपण्यापूर्वी औषधे नष्ट करून तीच औषधे बाहेरून जास्तीच्या दरात विकत घेण्यास भाग पाडून झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशी समितीच्या अहवालात शिफारस केल्यानुसार संस्थेचे विशेष लेखा परीक्षण पूर्ण झाले.

वन अधिकाऱ्याकडे सिंहगड आराखड्याची  मागणी

खडकवासला, ता. सिंहगड किल्ल्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करताना वन विभागाने पुढाकार घेऊन राज्य पुरातत्व, पर्यटन, महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ऊर्जा विभाग यांना सहभागी करून विकास आराखडा मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी वन अधिकाऱ्यांशी चर्चा सिंहगडाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आमदार तापकीर यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पर्यटन विभागाचे संचालक आशुतोष सलील यांच्याशी भेट घेऊन केली.

अधिक वाचा  बौद्धजन सहकारी संघाची काँसिल सभा मोठ्या उत्साहात संपन्न

सिंहगडावर भगवा ध्वज

पुणे महापालिकाच्या माध्यमातून सिंहगडावर भगवा ध्वज उभारण्यात येणार असून, त्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे गडाचे पावित्र्य राखण्यासाठी मदत होणार आहे. त्या ठिकाणी नव्याने वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी गडावर पाणी योजना राबविण्यात येणार आहे.

घाटात बॅटरीवरील वाहने

गडावरसंख्या लक्षणीय वाढली असून तळई उद्यानालगतची मोकळी जागा वाहनतळाकरिता वापरून पुढे बॅटरीच्या गाड्यांमधून नागरिकांना गडावर सोडण्याच्या नियोजन. त्यामध्येदेखील स्थानिक वाहनमालक, चालक यांना  रोजगरनिर्मिती.

कोथरुड येथे मेट्रो स्थानक व शिवसृष्टी

कोथरुड शिवसृष्टी बीडीपीची जागेवर करणे शक्य आहे याचा विचार व्हावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत पुण्यामध्ये शिवसृष्टी झालीच पाहिजे, यावर मुंबईतील बैठकीत एकमत केले. त्यामुळे रखडलेल्या शिवसृष्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रस्तावित मेट्रोला नियोजितशिवसृष्टीचा फायदाच होईल.

शिवसृष्टीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचा मेट्रोला फायदाच होईल, असेही या वेळी सांगण्यात आले. मेट्रोच्या रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी या दोन्ही तोडग्यांना अनुकूलता दर्शवली; मात्र त्याची तांत्रिक बाजू पाहावी लागेल, असे ते म्हणाले. या विषयातील काही तंत्रज्ञ व नितीन करीर, कुणाल कुमार अशी बैठक घेण्याची सूचना बापट यांनी केली.