मुळशी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ओंकार मेमाणे यांची आज पतित पावन संघटनेच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसे पत्र आज त्यांना जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे व संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव चव्हाण, प्रांतउपाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांचे हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी ओंकार मेमाणे यांनी मुळशी तालुक्यतील तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रथे प्रमाणे अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभे राहण्यासाठी आज पासून सुरवात केली आहे असे सांगितले.

संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना एकत्र करून एक नवा व विधायक असा मुळशी पॅटर्न उभा करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत राहू असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी संघटनेचे प्रांत संपर्क प्रमुख राजेशभाऊ मोटे, प्रांतसंघटक सिताराम खाडे, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास माणेरे तसेच संघटनेचे मनोज नायर, गोकुळ शेलार, जालिंदर टेमघरे, स्वप्नील नाईक, निलेश जोशी, संतोष शेंडगे गुरू कोळी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  ठाकरेंवर ममता बॅनर्जींना विश्वास; म्हणाल्या “आम्ही पुरुन उरलो, सरकारी दहशतवाद्यांचा महाराष्ट्रही…