पुणे : आता मंडळांना वर्गणी मिळत नाही. तसेच जाहिरातीही नाहीत. मंदिरे बंद असल्याने दानपेट्यांमध्येही पैसे नाहीत. त्यामुळे छोट्या व मोठ्या मंडळांसमोरही खर्च भागवायचा कसा असा प्रश्‍न आहे.मागीलवर्षी साधेपणावर भर दिला, त्यातून उरलेल्या पैशांचा उपयोग अन्नधान्य किट, जेवण, पाण्याच्या बाटल्या, घरोघरी भाजीपाला, रक्तदान यांसारख्या असंख्य उपक्रमांसाठी वापरला. कोरोनाबाधीत रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयोगात आणला. त्यामुळे बहुतांश मंडळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाली आहेत.

‘‘कोरोना, लॉकडाउनमुळे मंडळांकडे पैसेच नाहीत. मागीलवर्षी कसेबसे उत्सव व उपक्रमांसाठी पैसे खर्च केले. यंदा काय करावे, हा प्रश्‍न आहे.

अधिक वाचा  दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' प्रवाशाला  पुण्यात होम क्वारंटाईन

साईनाथ मंडळ ट्रस्ट 

जाहिराती व कमानींना परवानगी मिळाल्यास मंडळांपुढील किमान आर्थिक संकट दूर होईल.’’ मंडळांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. जाहिराती व मंडपाची परवानगी मिळाल्यास किमान काही प्रमाणात मंडळांना आर्थिक मदत होऊ शकेल.

                                                                      सेवा मित्र मंडळ

काय आहेत कारणे….

त्सवावर कोरोनाचे सावट व निर्बंध    -वर्षभर मंदिरे बंद असल्याने

अधिक वाचा  ‘आरटीई’च्या प्रवेशांस पॅनकार्ड बंधनकारक

दानपेट्या रिकाम्या                  -लोकांकडून वर्गणी मिळण्याची चिन्हे कमी

साध्या उत्सवासाठी खर्च-

४० हजार मंदिरासमोरील छत        १५ हजार लाइट/स्पीकर

१५ हजार हार, फुले, सजावट          ५ हजार प्रसाद

१५ हजार छोटे उपक्रम                 १० हजार पूजा, धार्मिक विधी