पुणे : सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. त्यामुळे यंदाही देखावे तयार न करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने करावा. भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. मंडळांनी आरोग्य सेतु ऍप वापरण्यास प्राधान्य देऊन सामाजिक उपक्रम राबवितानाही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केली आहे.

याबरोबरच राज्य सरकार, पुणे महापालिकेच्या नियमांचे पालन करतानाच पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी आचारसंहीता तयार केली असून त्याचे पालन करण्याचेही नागरीकांना आवाहन केले आहे. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये सार्वजनिक आरोग्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, पोलिसांकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.

गणेश मुर्ती खरेदी

– मंडळांनी व नागरिकांनी मुर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीनेच करावी

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी ; ६२३ जणांच्या बदल्या

– शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर मुर्ती विक्रीची व्यवस्था

श्रींचे आगमन

– श्रींच्या आगमन व विसर्जनासाठी मिरवणुक काढू नये

– आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी व्यक्ती एकत्रीत येतील

गणेश प्रतिष्ठापना

– मंदिरे असलेल्या मंडळांनी मंदिरातच प्रतिष्ठापना करावी

– मंदिरे नसणाऱ्यांसाठी अनन्य साधारण परिस्थीतीत महापालिकेच्या नियमानुसार छोट्या मंडपास परवानगी

पुजा व धार्मिक विधी

– आरती व पुजेसाठी 5 व्यक्ती हजर राहतील, बाहेरील व्यक्तींचा सहभाग टाळावा

– गर्दी होईल, असे उपक्रम टाळावेत

गणेश दर्शन

– श्रींच्या दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन, केबल नतेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे करावी, छोटे व्हिडीओ करावेत

– दर्शनाकरीता ऑनलाईन टोकन, डिजीटल पास सुविधा वेळेची मर्यादा ठेवावी

– सामाजिक अंतर नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी

अधिक वाचा  रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता; आठवडाभर कोरडे हवामान

– निमंत्रित व अतिमहत्वाच्या व्यक्तींना दर्शनाला परवानगी देऊ नये

सांस्कृतिक कार्यक्रम

– उत्सव साध्यापद्धतीनेच करावा

– सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य उपक्रम राबवावे

सुरक्षा

– आग प्रतिबंधक उपाययोजना, संशयास्पद वस्तुबांबत सजगता बाळगणे

– मुर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणाऱ्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी

– संरक्षणासाठी पाच कार्यकर्ते किंवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास ठेवावेत

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

– केंद्र, राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे

– व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क येईल, यादृष्टीने काळजी घ्यावी

– गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आरोग्य सेतु ऍप वापरणे बंधनकारक आहे

– सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा

गणेश विसर्जन

– मुर्तीचे विसर्जन मंडळाने मंडपालगत कृत्रीम हौदात करावे, फिरत्या हौदाचा वापर कराव

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी

– विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही

– सार्वजनिक घाट, नदी, नाल्यावर विसर्जनास मनाई

– महापालिकेकडून हौदांची पर्यायी व्यवस्था

– मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रमास मनाई

– घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन घरीच करावे

– अपवादात्मक परिस्थतीतच सोसायटीतील कृत्रीम हौदात घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करावे

“शहरातील गणेशोत्सव यंदाही साध्या पद्धतीने व्हावा, कोणत्याही प्रकारे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये. यादृष्टीने पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहीता तयार केली आहे. मंडळांनी त्याचे पालन करावे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध घालता येईल.”

                                      – डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.