सिंधुदुर्ग: सामनामधून होणारी टीका थांबवली नाही तर प्रहार मधून उत्तर देणार. नितेश, निलेश राणेंवर हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी इशारा दिला आहे. संजय राऊत शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून कारभार सुलभ व्हावा यासाठी काही मदत करत नाहीत. अग्रलेख लिहिताना विधायक,सामाजिक, विकासावर ते अग्रलेख लिहू शकत नाहीत. असा प्रतिहल्ला ही राणेंनी केला आहे. वृत्तवाहिनीवर मुलाखतीत नारायण राणेंनी एकूणच आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. काय म्हणाले मुलाखतीत नारायण राणे सविस्तर जाणून घेऊया.

माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले. शिवसेनेत असतानाही असे अनेक प्रसंग विरोधकांकडून आले. आणि आता शिवसेनेकडून असे अनेक प्रकार घडत आहेत. मी खचून जाणारा नाही. माझं खच्चीकरण मी होऊ देत नाही. माझे काही मित्र म्हणतात. कोर्टाची ॲक्शन घेतल्यानंतर राणे मवाळ झाले आहेत. मवाळपणा हा माझ्या रक्तात नाही. अनेक लोकांशी लढतोय. शिवसेनेत असताना शिवसेनेच्या विरोधकांशी लढलोय. 91 पासून मला संरक्षण आहे. कोकणात आल्यानंतर जनसमुदाच्या उपस्थितीवरून स्पष्ट होते की, जनतेचे माझ्यावर किती प्रेम आहे.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

ते पुढे म्हणाले, माझ्यात जो आवेश आहे, जिद्द आहे हे माझ्या रक्तातच आहे. उगाच उतावळेपणाचा आव मी आणत नाही. काही जणांना आपण काय बोलतो हे समजत नाही. बोलतात एकीकडे हातवारे, एकीकडे चेहरे करतात. बाळासाहेब गेले तेव्हाच ठाकरे भाषा तिथेच संपली. ती शैली, तो आवेश आता पाहायला मिळणार नाही. कोणीही आव आणू नका.अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत .नुसते आडनाव लावले म्हणजे ठाकरे भाषा होत नाही. यासाठी गुणात्मक कृती दिसायला हवी. असा हल्लाबोल ही उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी केला.

उद्धव ठाकरे खासगी मध्ये बोललं तरी मला कळतं. सूडबुद्धीने जर कारवाईच करत राहिले तर जशास तसं उत्तर देण हे आमचं काम आहे. मी भाजपात आहे याची मला जाणीव आहे. मी जाणीवपूर्वक कोणाची कळ काढत नाही.आणि मला विनाकारण डिवचण्याचे काम करू नये असा सूचक इशाराही राणेंनी दिला.संजय राऊत शिवसेना संपवण्याचा काम करत आहे.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून कारभार सुलभ व्हावा यासाठी काही मदत नाहीत. अग्रलेख लिहिताना विधायक ,सामाजिक विकासावर अग्रलेख लिहू शकत नाहीत.

अधिक वाचा  Rakhi sawant: 'माझ्या बॉडीचा हा पार्ट खोटा'; 16 लाख किंमत

माझ्यापासून ठाकरे कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. याचीही खबरदारी मी घेईन. कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याशी माझं वैयक्तिक वैर नाही. संजय राऊत यांच्या पासून माझ्यावर टीका करायला सुरुवात झाली. आणि याच उत्तर मला द्यावेच लागेल. मी गप्प बसणार नाही. त्यांना आता गप्प बसावं. नाहीतर गौप्यस्फोट होईल. असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.