बालेवाडी : महापालिकेच्या 269 जागा अँमेनिटी स्पेस Amenity Space सुविधा क्षेत्र भाड्याने देण्याच्या निर्णयाविरुद्ध प्र.क्र. 9 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सोसायटीतील नागरिकांकडून निषेध protest मोर्चा काढण्यात आला. याचे कारण महापालिकेने शहरातील अमेनिटी स्पेस सुविधा क्षेत्र भाड्याने देण्यासाठी तयार केलेल्या यादीत सर्वाधिक जागा या बाणेर Baner म्हणजेच 42 भूखंड तर बालेवाडी येथील 23 भूखंडांचा समावेश आहे.

या जागा या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आहेत आणि त्या नागरिकांसाठी असल्या पाहिजेत, कोणत्याही परिस्थितीत या जागा बिल्डरच्या घशात जाता कामा नयेत यासाठी बाणेर येथे प्र. क्र. 9 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तसेच सोसायटीतील नागरिकांकडून या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ता. 29 ऑगस्ट रोजी बाणेर येथील कै.बाबुराव सायकर चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

अधिक वाचा  भारत - दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून आली मोठी अपडेट

या प्रसंगी सोसायटीतील प्रतिनिधींनी या निर्णयासंदर्भात त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याबद्दल संताप व्यक्त करत निर्णयास विरोध दर्शविला आहे. या प्रसंगी आनंद गडकर,आरूण सामंत , सिध्देश्वर वानखेडे , संपत कनवडे , सुषमा ताम्हाणे ,रखिताई श्रीराव , पुनम विधाते ,प्रा.रूपाली बालवडकर , अर्जुन शिंदे , डॉ सागर बालवडकर,जंगल रणवरे ,समीर चांदेरे ,नितीन कळमकर ,विशाल विधाते ,संजय ताम्हाणे,अर्जुन ननावरे ,मनोज बालवडकर ,डॉ मिरा विधाळे , प्रची सिद्दीकी , बाणेर बालेवाडी मधील सोसायटीचे नागरिक ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.