मुंबई : जून आणि जुलै महिन्यात झोडपून काढणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र मुंबईसह महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन वेळा पावसात खंड पडला असून, महाराष्ट्रात सध्या ६१ टक्के जलसाठ्याची नोंद झाली आहे. परिणामी, आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे सप्टेंबरकडे लागले आहेत. भारतीय हवामान खात्याकडील माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राला दिलासा देऊ शकेल.

‘वेगरिस’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार, जून आणि जुलै महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस झाला. जुलै महिन्यातसुद्धा २०० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या काळात झालेला पाऊस हा सरारसरीपेक्षा अधिक नोंदविण्यात आला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाची नोंद खालावली आहे. यास ‘ब्रेक मान्सून’ कारणीभूत आहे.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ३१ ऑगस्टपासून पुन्हा मान्सून विदर्भातून सक्रिय होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस २० सप्टेंबरपर्यंत राहील. पुढे मान्सून राजस्थानच्या वरच्या भागातून परतीचा पाऊस सुरू करेल. या काळात महाराष्ट्रात गडगडाटी पाऊस होईल.

‘ब्रेक मान्सून’ काय?

ब्रेक मान्सून म्हणजे मान्सूनमध्ये खंड पडणे होय. ऑगस्ट महिन्यात मान्सूनमध्ये दोनवेळा खंड पडला. ब्रेक मान्सूनमध्ये पाऊस उत्तरेकडे, हिमालयाकडे, बिहार, उत्तर प्रदेशकडे सरकतो. अशावेळी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले क्षेत्र ब्रेक मान्सूनच्या काळात आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याने पाऊस कमी पडतो. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी आहे.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ३१ ऑगस्टपासून पुन्हा मान्सून विदर्भातून सक्रिय होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस २० सप्टेंबरपर्यंत राहील. पुढे मान्सून राजस्थानच्या वरच्या भागातून परतीचा पाऊस सुरू करेल. या काळात महाराष्ट्रात गडगडाटी स्वरूपाचा मुसळधार पाऊस होईल.