वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व्हेल माशाची उलटी ( Ambergris ) विक्री करणारे अज्ञात इसम येणार असल्याचे समजले. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा व वनकर्मचारी यांनी बनावट गिऱ्हाईक बनवून अज्ञात इसमांना पकडणे कमी सापळा रचून पूर्णा नगर, पिंपरी चिंचवड येथे मुहमदनईन मुटमतअली चौधरी, वय ५८, योगेश्वर सुधाकर साखरे, वय २५, राहणार बालेवाडी, पुणे ०४५ अनिल दिलीप कामठे, वय ४५, राहणार- – फुरसुंगी, पुणे ४१२३०८, ज्योतिबा गोविंद जाधव, वय ३८, कृष्णात श्रीपती खोत, वय ५९, सुजाता तानाजी जाधव, वय ४४, असे व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ साधारणत: ०३ कि.ग्रा. असे एकूण ०६ आरोपी रंगेहाथ पकडले असून त्यांचे कडून व्हेल माशाची उलटी (Ambergris) सह तसेच सह Maruti Swift वाहन जप्त करण्यात आली.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

सदरील कार्यवाही ही श्री. राहुल पाटील, (भा.व.से.), उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग यांचे निर्देशांनुसार व मार्गदर्शनाखाली श्री. मयूर बोठे, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे यांचे व श्री. प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा, श्री. महेश मेरगेवाड, वनपाल, श्री. विजय शिंदे, वनपाल, श्री. सुरेश बर्ले वनरक्षक, श्री. रामेश्वर तेलंग्रे, वनरक्षक, श्री महादेव चव्हाण, वनरक्षक, श्री. गणेश पाटील व इतर वनकर्मचारी यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली पार पडली.

आपले परिसरात कोणतेही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ देण्यात यावी तसेच हॅलो फॉरेस्ट टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक, पुणे श्री. राहुल पाटील यांनी केले.