किष्किंधानगर, सुतारदरा परिसरातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी स्वारद फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून महापालिकेचे कोविड लसीकरण केंद्र सर्व्हे क्रमांक ११२, विठ्ठल रूक्मिणी मंदिराजवळ, शिवसाई नगर, सुतारदरा येथे सुरू करण्यात आले आहे.

सुतारदरा भागातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी लसीकरण घेण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या या अडचणी लक्षात घेऊन स्वारद फाउंडेशन च्या संस्थापिका सौ.स्वातीवहिनी शरद मोहोळ यांनी सतत पाठपुरावा करत राजकीय कुरघड्यांवर मात करत आज परीसरातील सामान्य लोकांसाठी लसीकरणाची सुविधा सुरू केली.

सलग दोन महिने पाठपुरावा केल्यानंतर आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन गरिबीची जाण असलेल्या डॉ.सौ.अंजली टिळेकर मॅडम( कोथरूड वॉर्ड मेडिकल ऑफिसर ) यांनी शिबिर सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचे संस्थापिका स्वातीवहिनी मोहोळ यांनी सांगितले. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारा महत्वाचा घटक प्रत्येक व्यवसाय व उदयोगधंदयाचा कणा असणारा कामगार वर्ग जेथे राहतो त्याच सर्वसामान्य जनतेकडे आजपर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष होते व लसीकरणात प्राधान्य देण्यात येत नव्हते. या जनसामान्यकरीता लसीकरण केंद्र सुरू केल्याने या परिसरातील जनतेच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने कार्य स्वातीवहिनी मोहोळ यांनी केले.

अधिक वाचा  राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका - फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची यथासांग पूजा करून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मिलिंद अलाटे (कोथरूड वॉर्ड आरोग्य सेवक), डॉ.सौ.स्वाती जाधव मॅडम, डॉ.सौ.स्नेहा गोलवे, डॉ.सौ.ॠतुजा तळपे मॅडम, स्वामी माने साहेब ,सौ.मनाली मच्छिंद्र खैरे आणि पी.एम्.पी.एम्. एल्‌. चा सर्व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

यावेळी सिताराम खाडे ( पतित पावन संघटना महाराष्ट्र प्रांत संघटक), श्रीकांत शिळीमकर ( पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष), पप्पू टेमघरे ( पतित पावन संघटना पुणे शहर उपाध्यक्ष), सुतारदरा नागरिक विकास मंचाचे सदस्य अशोक शेलार, अनिल मोरे, शंकर चहाणे, दत्ता साठे, पालके सर, संदिप नाना कुंबरे, प्रकाश बावधने सर, संतोष सुर्वे, साहेबराव काळे, सचिन मार्कंडे, गणपत मामा भगत, भारतभाऊ सुतार, कैलास लायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.