पुणे – लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट कोथरूड कचरा डेपो येथील मेट्रो कार शेडवर जाऊन लागल्या. या गोळ्या शेडमधून आत आल्या. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.

मेट्रोच्या सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडच्या जुन्या कचरा डेपोवर मेट्रोचे कार शेड आहे. याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या पलीकडील बाजूस लष्कराच्या जवानांचे प्रशिक्षण सुरू होते. मेट्रो शेडमध्ये काम करीत असताना पत्र्यावर अचानक गोळ्यांचा आवाज झाला. यातील काही गोळ्या पात्रता छेदून आतमध्ये आल्या. यातील एक गोळी कर्मचाऱ्याला लागली आहे.

अधिक वाचा  अमोल कोल्हे ट्रोल, पुणे प्रशासनावर केली टीका

त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, ही गोळी एके 47 किंवा तत्सम रायफलची असावी असा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. लष्कराकडुन या घटनेबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.