वॉशिंग्टन: अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले. याची जबाबदारी आयएसआयएस दहशतवादी संघटनेने घेतली असून या हल्ल्यात 12 अमेरिकी सैनिकांसह 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून त्याची शिक्षा त्यांना देऊ, असा इशारा दिला आहे.

बायडेन म्हणाले, आम्ही माफ करणार नाही, विसरणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून मारू आणि शिक्षा देऊ. आम्ही अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांना वाचविणार आहोत. तसेच अफगाण सहकाऱ्यांना बाहेर काढी. आमचे मिशन सुरुच राहिल. काबुल विमानतळावर झालेल्या या हल्ल्यात अद्याप तालिबान आणि आयएसआयएस दरम्यान काही संबंध आढळलेला नाही.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

बायडेन यांनी तीनवेळा हल्ल्याचा संशय व्यक्त केलेला

काबुल विमानतळावर आयएसआयएस हल्ला करण्याची शक्यता बायडेन यांनी तीनवेळा व्यक्त केली होती. 20 ऑगस्टला त्यांनी विमानतळावर किंवा त्याच्या आजुबाजुला असलेल्या कोणत्याही दहशतवादी संकटावर नजर ठेवून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी आहेत, जे जेल तोडल्यानंतर बाहेर पडले आहेत, असे म्हटले होते.

15 सैनिक जखमी

काबुल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन ब़ॉम्बस्फोट झाले यामध्ये 12 अमेरिकी सैनिक ठार झाले. रात्री उशिरा अमेरिकी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. यामध्ये 11 मरीन आणि एक नेव्हीचा सैनिक आहे. तर 15 सैनिक जखमी झाले आहेत. सुरुवातीला 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, नंतर हा आकडा 60 पर्यंत वाढला. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

‘आयसिस’च्या खाेरासान गटाने हा हल्ला केल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी हा आत्मघातकी हल्ला केला. त्यापैकी दाेन मानवी बाॅम्ब हाेते. त्यांनी स्वत:ला बाॅम्बस्फाेटाने उडविले, तर तिसऱ्या दहशतवाद्याने बेछूट गाेळीबार सुरू केला. त्याने एका उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या दिशेनेही गाेळीबार केला. मात्र, विमान सुखरूप उडाले. पहिला बाॅम्बस्फाेट विमानतळाच्या आत धावपट्टीजवळ झाला. आत्मघातकी हल्लेखाेर लाेकांच्या गर्दीत शिरला, तर दुसरा स्फाेट हाॅटेल बॅरनबाहेर झाला. हॉटेल बॅरन हे विमानतळाजवळ असून ब्रिटनचे सैनिक तेथे मुक्कामाला आहेत.

बाॅम्बस्फाेट झाल्यानंतर विमानतळाबाहेर प्रचंड गाेंधळ झाला. स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना कचऱ्याच्या गाड्यांमध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आले. बाॅम्बस्फाेट अतिशय तीव्र हाेते. त्यामुळे मृतांच्या शरीराचे तुकडे झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही जणांनी याबाबतची छायाचित्रे आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले.