विलास मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी ज्याला कधी नियतीही वेगळं करू शकले नाही…… पण हाच कट्टर कार्यकर्ता जेव्हा अचानक सर्व जगाचा निरोप घेऊन अनंतात विलीन झाला त्यावेळेस मात्र सर्वपक्षीय कोथरूडकर नागरिकांच्या श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली आणि व्हाट्सअप स्टेटस, फेसबुक स्टेटस या सच्च्या कार्यकर्त्याची सर्वदूर पसरलेली आपुलकीचे नाते उघड झाले आणि एक मनाला खूप मोठा धक्का बसला…..

आजवर सर्व कोथरूडकर नागरिकांमध्ये विलास मोहोळ महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कट्टर कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झालेली असताना त्याच्या अचानक जाण्याने या नव्या पिढीतील सर्व कार्यकर्त्यांना खरी विलास मोहोळ यांच्या कार्याची ओळख झाली ती सर्वपक्षीय अन् पुणे शहरभरच्या सर्व स्तरातील लोकांच्या उपस्थितीमुळे……

भारतीय जनता पार्टीचे १९९२ पासून भाजपा सभासद म्हणून विलास ने कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये कार्यरत असताना, भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर विलास मोरे यांच्या कार्याला सुरुवात झाली. एक सच्चा कार्यकर्ता मिळालेल्या पदाला किती न्याय देऊ शकतो याची प्रचिती सर्व पक्षात असलेली विलास मोहोळ यांची मैत्री हीच होय.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

भाजपा युवा मोर्चा च काम करत असताना पक्षातील सर्व वरिष्ठांचा मान राखण्यात विलास मोहोळ यांनी धन्यता मानली. यामुळेच पुणे महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर स्विकृत सभासद म्हणून बावधन कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात विलास मोहोळ संधी मिळाल्यानंतर आपल्या कार्याचा आवाका वाढत होता विलास मोहोळ  याने शास्त्रीनगर कोथरूड भागांमध्ये एखाद्या नियुक्त नगरसेवकाला लाजवेल या प्रकारे काम करण्याला सुरुवात केली. कोरोना काळात आपल्या भागातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी अहोरात्र कोणत्याही अपेक्षांची पर्वा न करता अविरत कार्यरत असताना या भागातील सर्वसामान्य नागरिकांनी विलास मोहोळ यांना पाहिले होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी आणि विद्यमान नगरसेवक या भागातील लोकांना अनेक मदत आणि जीवनावश्यक वस्तू देत असताना विलास मोहोळ हे कायमच योग्य आणि गरजू लोकांना याचा लाभ मिळवण्यासाठी लक्ष देत होते. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शास्त्रीनगर हा हॉटस्पॉट झाल्यानंतर दिवस-रात्र आपल्या भागातील लोकांना या भयानक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी लोकांकडे कायम पाठपुरावा करत होता. रात्रंदिवस कष्ट करताना विलास मोहोळ कधीही थकलेला किंवा चिडलेला स्थानिकांनी पाहिला नाही हीच विलास मोहोळ ची खरी ताकत होती आणि आज त्याच्या जाण्याने सर्वजण सुन्न आहेत.

विलास, तुझ्या निस्सीम समर्पणाला सलाम !

माझा विलास आज आपल्यातून अकाली निघून गेला. त्याची ही एक्झिट मला वैयक्तीकदृष्ट्या प्रचंड वेदना देणारी आणि हे दुःख कधीही कमी न करणारी आहे. विलासने माझ्या आयुष्यात जीव ओवाळून टाकायला तयार होणारा भाऊ, अत्यंत जिवलग आणि कोणत्या परिस्थितीत साथ न सोडणारा मित्र, निवडणुकीवेळी लढणारा कट्टर कार्यकर्ता अशा अनेक भूमिका निभावल्या.

अधिक वाचा  कोणत्याही निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होऊ नयेत: पटोले

आजवर विलासने कोणतीही अपेक्षा न करता माझ्या सगळ्या राजकीय प्रवासात शब्दशः सावलीसारखी साथ दिली. कोणताही प्रसंग असो विलास माझ्यासोबत उभा राहिला नाही, असं कधीही घडलं नाही. विलासने आजवर स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी मोठी स्वप्न पाहिली, त्या स्वप्नांचा पाठलाग करताना जीवाचं रान केलं. पण तोच विलास आता माझ्यासोबत नाही, ही कल्पनाही करणं अशक्य आहे. विलासला श्रद्धांजली वाहण्याची वेळ मला नियतीने का आणली? हे कोडेही न उलगडणारे आहे. यापुढचा माझा प्रवास विलासशिवाय असेल, याचा विचार करताना मन जड होतंय, घायकुतीला येतंय !!

विलास, तुझ्या निस्सीम समर्पणाला मनापासून सलाम ! भावपूर्ण श्रद्धांजली !!!

मा. मुरलीधर मोहोळ पुणे महापौर