धायरी भागात विविध सामाजिक कार्यांत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित दानवले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भवन पुणे शहर येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्राहक संरक्षण समिती पुणे शहर उपाध्यक्ष उपाध्यक्ष केदार मारणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस रोहन पायगुडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे त्यांचे पक्षात स्वागत केले व आदरणीय पवार साहेबांचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घ्येय धोरणे समाजात, तळागाळात रुजवण्यासाठी रोहीत दानवले कार्यरत असतील हा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकारणी मजबूत करण्यासाठी दानवले यांच्या कार्याचा फायदा होईल या हेतूने ही नियुक्ती देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला