पुणे : पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 10 मार्च 2021 ला पुणे महापालिकेने यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी राष्ट्रवादी आक्रमक

पुणे महापालिकेतील कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून अजूनही वंचित आहेत. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याच मागणीला घेऊन पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षांनी कंबर कसली

अधिक वाचा  भ्रष्टाचारमुक्त अन् पारदर्शक राजकारणास आम आदमीच पर्याय ; कृष्णा गायकवाड यांचे पत्राद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन

पुण्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विविध पक्षांनी कंबर कसली असून नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर नेतेमंडळी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पुणे महानगरपालिकेत एकूण 164 जागा आहेत. बहुमतासाठी राजकीय पक्षाकडे 84 नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बहुमताचा आकडा न गाठता आल्यास भाजप तसेच इतर पक्ष नेमकं काय करतील याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.