मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जन आशिर्वाद यात्रेत आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अटकेनंतर जामिन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊतांवर चांगलाच निशाणा साधला आहे. राऊत यांनी आपल्या अग्रलेखात राणे नारायण राणे म्हणजे छेद पडलेला फुगा असे म्हटले आहे. यावर राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे संपादक म्हणून लायकीचे नाहीत. जे फक्त उद्धव ठाकरे खूश होतील इतकेच लिहितात. राऊतांना 17 तारखेनंतर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे. तसेच मी गँगस्टर होतो तर मला मुख्यमंत्री कसं केलं? म्हणजे शिवसेनेत सर्व गँगस्टरच आहेत का? असे सवालही राणे यांनी केले आहेत.

अग्रलेखात काय म्हणाले संजय राऊत?

नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत त्यांचे जे नाव झाले, ही शिवसेना या चार अक्षरांची कमाई. शिवसेना सोडल्यानंतर राणेंचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा पराभव झाला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचे तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखवायचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडूक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘मी नॉर्मल माणूस नाही’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते अबनॉर्मल आहेत ते तपासावे लागेल.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

मोदींनी जनतेचे आशीर्वाद मागण्यास सांगितलं, परवापासून पुन्हा यात्रा सुरु होईल

तसेच, गेले काही दिवस माझा जनआशीर्वाद यात्रा चालू असताना जे काही प्रसारमाध्यमात येत होतं त्याची सगळी माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगूलपणाचा फायदा घेतात हे लक्षात आलं. त्यावर मी आज काही बोलणार नाही. आमची यात्रा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सातवर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवलं ते सांगण्यासाठी ही यात्रा होती. दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं. तसंच तुमच्या खात्याला सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही 19 तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. दोन दिवस गॅप ठेवलाय. परवापासून यात्रा सुरु होईल, असे भाष्य राणे यांनी केले.

अधिक वाचा  शेवटची अंगारक विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; जाणून घ्या

मला कोणी काही करु शकत नाही, तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला घाबरत नाही

चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो.

पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला.