पुणे : महापालिके च्या आगामी निवडणुकीसाठी एक प्रभाग एक नगरसेवक अशी पद्धत निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने एक प्रभाग एक नगरसेवक ही शिवसेनेची मागणी तूर्त मान्य झाल्याचे दिसून येत आहे. मात्र एक प्रभागाऐवजी एक प्रभाग दोन नगरसेवक या पद्धतीने निवडणूक होणार असल्याचे संके त राजकीय वर्तुळातून मिळत असल्याने शिवसेनेची तूर्त सरशी झाल्याचे चित्र आहे.

महापालिके ची आगामी निवडणूक दोन सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे घेण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्या वेळी शिवसेनेकडून एक नगरसेवक एक प्रभाग असावा, अशी जाहीर भूमिका मांडण्यात आली होती. तीन नगरसेवकांचा एक प्रभाग किं वा सध्याचा चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीला शिवसेनेचा विरोध आहे. आगामी निवडणूक कोणत्या पद्धतीने घ्यायची, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. तो आम्हाला मान्य असेल. मात्र मुंबई महापालिके प्रमाणेच एक नगरसेवक एक प्रभाग या पद्धतीने पुण्यातही निवडणूक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शहर पदाधिकाऱ्यांनी केली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे शिवसेनेची ही मागणी मान्य झाल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

सन २००७ मध्ये शिवसेनेला एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा मोठा फायदा झाला होता. शिवसेना नगरसेवकांची संख्या ८ वरून २२ पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर सन २०१७ मध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला होता. एक प्रभाग असल्यास मध्यवर्ती भागातून शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून येतील, असा अंदाज व्यक्त के ला जात आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशात पुढील काही दिवसांत बदल होईल, असे सर्वच राजकीय पक्षांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मात्र प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतरच प्रभागाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक

एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी शिवसेनेची प्रथमपासूनच मागणी होती. या पद्धतीचा नेहमीच शिवसेनेला फायदा झाला आहे. त्यामुळे याच पद्धतीने निवडणूक घ्यावी, अशी आमची मागणी कायम आहे. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

– संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना