आज यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान ची नियोजनात्मक आढावा बैठक खडकवासला येथे संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण हे होते. यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे पुणे शहर निरीक्षक व पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.आनंदजी तांबे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

तसेच यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.पवनराजे बंबळुगे तसेच खडकवासला च्या महिलाध्यक्षा सौ.सोनाली ताई खंदरकर ,पुणे शहर उपाध्यक्ष मा सुरेशजी तोंडे पाटील व यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या सदस्य सौ. रूपालीताई निवेदकर उपस्थित होत्या. यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या पुढील विस्तारीकरनाबाबत दत्तात्रय चव्हाण यांनी उपस्थित पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांसोबत मार्गदर्शन पर चर्चा केली तर समितीचे पुणे शहर निरीक्षक आनंद तांबे यांनी सोने, चांदी, वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खाद्य पदार्थ ,मसाले, चहा पावडर, मिठाई व व इतर सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांची कशी फसवणूक होते व त्यासाठी कायदेशीर रित्या काय कारवाई करावी याची सविस्तर माहिती दिली,तसेच फसवणूक होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे ग्राहकांना मार्गदर्शन केले पाहिजे व त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत याचीही माहिती दिली.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

पवन राजे यांनी आलेल्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे व आयोजकांचे आभार मानले…!