पुणे – पुणे शहर पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे यांच्यासह रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सुनिल रामानंद, रितेश कुमार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रमुख अधिकारी आणि त्यांचे बदलीचे ठिकाण –

अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी ते अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा, पुणे), रितेश कुमार (संचालक, दळणवळण व परिवहन ते अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे), सुनिल रामानंद ( अपर पोलीस महासंचालक, सुधारसेवा ते संचालक दळणवळण व परिवहन, पुणे), राजेंद्र डहाळे (पोलीस उप महानिरीक्षक, बिनतारी संदेश ते अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर),

अधिक वाचा  महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर

अशोक मोराळे (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर), आर एल पोकळे (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, ठाणे शहर), डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), सुधीर हिरेमठ (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, पुणे, पदोन्नतीने) अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहरचे संजय ऐनपुरे यांची बिनतारी संदेश पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सीआयडीमधील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) मुंबई येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.