पुणे – शहरात झालेल्या राजकीय आंदोलनांमुळे पोलिसांकडून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरातील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अनुद्गार काढल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले तसेच भारतीय जनता पक्षाकडून राणे यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

राजकीय आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता असून राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील भारतीय जनता पक्षाचे कार्यालय, डेंगळे पूलाजवळ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय तसेच डेक्कन जिमखाना येथील शिवसेनेच्या कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा  या ३ राशींच्या धनात होऊ शकते वाढ; ‘हा’ ग्रह बदलणार राशी.