रायगड: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. मी असतो तर कानाखालीच चढवली असती, हे विधान नारायण राणे चांगलीच बघणार असेल आज दिवसभरामध्ये त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले असून आज नारायण राणे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

अधिक वाचा  हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती पारा ४१ अंशांवर, उष्णतेच्या झळा किती दिवस राहणार?

यांना बोलायचा अधिकार तरी आहे का?

महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे, असे म्हणत सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.

अधिक वाचा  अखेर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे

मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एक नवीन शहर विकसीत होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच शाळा, रुग्णालय, कॉलेजही येणार आहे. यामुळे येथील विकासाला गती मिळणार आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला.