चंद्रपूर: भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन च्या सदस्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली.

सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन  न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची खात्री करून व वेळ पडल्यास त्यांच्या  सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा संस्थेचे सदस्य भूषण सोनकुसरे यांनी यावेळी व्यक्त केला .वृक्ष रक्षाबंधनासाठी व पर्यावरणाला हानीकारक असणार्यां घटकांना वगळुन स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर करुन वृक्ष रक्षाबंधन केले.

अधिक वाचा  अभिजीत बिचुकलेंना करोना; हिंदी ‘बिग बॉस’ मध्ये राखी सावंतची निवड

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर ,भूषण सोनकुसरे, रश्मी कोटकर, ज्योत्स्ना गौरकार, तृप्ती गौरकार, सुरज हजारे, सुरज नवले व रिदम कोटकर व इतर सदस्य उपस्थित होते.