पुणे दि . भाजपा आपल्या दारी ऊपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने सामावेश झालेल्या गावांच्या विकास आराखडा ( २०२१ – २०४१ ) या विषयावर माहिती आणि चर्चासत्राचे आयोजन आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर सभागृह , किरकटवाडी येथे करण्यात आले होते. किरकटवाडी, नांदोशी गावातील जवळपास १०० शेतकरी आणि नागरिक ऊपस्थित असलेल्या या चर्चासत्रास आराखडा अभ्यासक इंजिनिअर चेतन पेठे सर यांनी मार्गदर्शन केले .

अनेक शेतकरी आणि नागरिकांनी आराखड्याविषयी आपले प्रश्न , अडचणी या चर्चासत्रात मांडल्या . विकास आराखड्याचा योग्य अभ्यास करून नवीन हद्दीतील नागरिकांनी या भागाचा नव्याने विकास होत असताना आपल्या सामुहिक हिताच्या सुचना तसेच आपल्या तक्रारी या विषयी हरकतींवर भर दिला पाहिजे तरच एक विकासाचे एक सर्वसमावेशक योग्य मॅाडेल ऊभे राहू शकेल असे मत चेतन पेठे सर यांनी मांडले .

अधिक वाचा  स्थानिक स्वराज्य संस्था: ओबीसी जागांच्या निवडणुका ही स्थगित - राज्य निवडणूक

या चर्चासत्रास माझ्यासह पालक नगरसेवक हरिदास चरवड , नगरसेविका निताताई दांगट , खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे , अनंतदादा दांगट , किशोर पोकळे , किरकटवाडी गावाचे सरपंच गोकुळ करंजावणे , नांदोशी गावाचे सरपंच भाऊसाहेब किवळे , सहकार आघाडी ऊपाध्यक्ष निळकंठ शेळके , किरण हगवणे , अनिल मते , शेखर हगवणे , सचिन दगडे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सभासद , नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने ऊपस्थित होते .

शेतकरी,नागरिक संयोजक पालक नगरसेवक आणि पेठे सर यांच्यात झालेल्या चर्चासत्रात अनेकांचे प्रश्न , त्यांच्या शंकाचे निरसन होण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा संयोजकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संयोजन पालक नगरसेवक निताताई दांगट , नगरसेवक हरिदास चरवड आणि सहकार आघाडी अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले होते.