रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी आयुष्यभर तन मन धन अर्पण करून रिक्षा चालक व मालकांसाठी योगदान देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केलेले आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रिक्षाचालकांचे प्रश्न व त्यांच्या समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेले काम व त्यांनी दिलेले लढे हे रिक्षा व्यवसायाइकांच्या कायम स्मरणात राहतील व या व्यवसायात नव्याने येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत रिक्षा फेडरेशनचे कार्याध्यक्ष मा श्री आनंद तांबे यांनी व्यक्त केले. रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष बाबा शिंदे यांचे नुकतेच निधन झाले, पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटना व रिक्षा चालक-मालक यांच्यावतीने बाबा शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी ते बोलत होते. पुणे कस्तुरी चौक येथील मेनकुदळे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती ,

अधिक वाचा  सीरमचे लस उत्पादन ५०% कमी; पूनावालांनी सांगितलं हे कारण….

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष मा श्री बाबा कांबळे,रिक्षा फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रकाश झाडे, ,ज्येष्ठ नेते चंद्रकांत गोडबोले, शरद पिंगळे,मनाली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता घुले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, आम आदमी रिक्षा संघटनेचे आनंद अंकुश, भाजपा वाहतुक आघाडी अध्यक्ष अंकुश नवले राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे, विजय रवळे,बाप्पू भावे, , दत्ता पाटील, पोपट कांबळे , अमर दुबे,प्रदीप भालेराव, अनिल पाटील आदी संघटना प्रमुख उपस्थित होते,

1990 साली सरकारने काळा कायदा आणला होता त्या विरोधामध्ये पुण्यामध्ये सर्व संघटनांना एकत्र करून देशभर संप पूकारून आंदोलन करण्यात आले त्यावेळी पुण्यामध्ये रिक्षा फेडरेशनचा उदय झाला त्यावेळी प्रथम अध्यक्ष म्हणून मा श्री प्रकाश झाडे व द्वितीय अध्यक्ष म्हणून कै. वसंत पाष्टे यांनी खूप मोलाचे कार्य केले, त्यानंतर बाबा शिंदे हे फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून आजपर्यंत कार्यरत होते. 1997 साली मुक्त रिक्षा परवाना बंद करावा यासाठी फेडरेशनने सलग 39 दिवस उपोषण करून शासनाला मुक्त परमिट बंद करण्यास भाग पाडले,त्याचप्रमाणे सहा सीटर रिक्षा सुद्धा हद्दपार करण्यासाठी पुणे शहराच्या सर्व पोलिसस्टेशन समोर सलग 45 दिवस साखळी उपोषण करून सहा सीटर पुणे महानगरपालिकेच्या बाहेर काढण्याचे फार मोठे कार्य रिक्षा फेडरेशनने केले.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

रिक्षा चालकांना पूर्वी टोपी व युनिफॉर्म घालणे सक्तीचे होते ही सक्ती हाणून पाडण्यासाठी बाबा शिंदे यांनी दिलेला लढा इतिहासातील महत्वाचा लढा आहे, पुण्यातील सर्वात जुनी व रिक्षा चालवून प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संघटना म्हणून रिक्षा फेडरेशनचा उल्लेख होतो ,त्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेल्या ३० वर्षा पासून बाबा शिंदे हे काम पाहत होते , रिक्षा फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहरामध्ये रिक्षावाले काका ही संस्कृती रुजवण्यासाठी विद्यार्थी वाहतुकीसाठी फार मोठे काम केले आहे , बाबा शिंदे यांच्या निधनानंमुळे रिक्षा विश्वाचे फार मोठे नुकसान झालेले आहे अशी हळहळ सर्व जण व्यक्त करीत होते.