पुणे – संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे आज (दि.23) पुणे दौऱ्यावर येत आहेत. येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज (डीआयएटी) आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांना ते भेट देणार आहेत.

‘डीआयएटी’ येथील सर्वसाधारण सभेत सिंह सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी नवीन इमारतीचे उद्‌घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेदेखील उपस्थित असतील. घोरपडी येथील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) येथील स्टेडियमचे नाव बदलून नीरज चोप्रा आर्मी स्पोर्टस स्टेडियम असे नामकरण करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्व सशस्त्र दलाचे जवान यांचा सिंह यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. भालाफेक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्यासह अन्य स्पर्धक यावेळी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.

अधिक वाचा  IND vs NZ 2ndTEST: ३ खेळाडू ‘आऊट; कोहलीचे संघात पुनरागमन'