वॉशिंग्टन – रशियातील विरोधी नेते अलेक्‍सी नावालनी यांच्यावर कथित विषप्रयोग केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये रशियन विरोधी पक्षनेते अलेक्‍सी नवालनी यांच्यावरील विषप्रयोगामुळे नोव्हिचोक नर्व्ह एजंटचा वापर केल्याबद्दल अमेरिका रशियन फेडरेशनवर दुसऱ्या फेरीचे निर्बंध लादत आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने एका निवेदनात म्हटले आहे.

काही रशियन बंदुकांच्या आयातीवर निर्बंध कायम असतील, असेही निवेदनात म्हटले आहे, नवलनी यांच्यावरील विषप्रयोगाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ब्रिटन आणि अमेरिकेने संयुक्त निवेदन जारी केले आणि रशियाला रासायनिक शस्त्रसंधीचे पालन करण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

विषप्रयोगानंतर उपचारांसाठी जर्मनीला गेलेल्या नवालनी यांनी पॅरोलच्या शर्तींचा भंग केल्याबद्दल नवालनी यांना अटक करून तुरूंगात टाकण्यात आले आहे. त्यांना अडीच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ रशियामध्ये मोठे आंदोलनही झाले होते.