रक्षाबंधनानिमित्त भारतीय जवानांसाठी स्वारद फाऊंडेशनच्या महिला व पदाधिकारी यांनी संकलित केलेल्या २५ हजार राख्या भेट म्हणून पाठविल्या असून लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामध्ये स्वराज फाउंडेशन च्या वतीने या जमा करण्यात आलेल्या राख्या देण्यात आल्या आहेत. आज रक्षाबंधनानिमित्त देशाच्या सीमेवरती या रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे लष्कराच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सुतारदरा भागामध्ये एक राखी कर्तव्याची….. माझ्या जवानांची!…. अशी मोहीम! स्वारद फाउंडेशन च्या वतीने सुतारदरा भागात राबविण्यात आली होती. या प्रकारचा अनोखा उपक्रम कोथरुड मध्ये प्रथमच होत असल्याने परिसरातील असंख्य महिला भगिनींनी प्रतिसाद देत हजारो राखी चे संकलन केले. सुतारदरा, परमहंस नगर, शिक्षक नगर, रामबाग कॉलनी, माधवबाग सोसायटी, पेटकर अशा विविध सोसायटीच्या भागांमध्येही स्वारद फाउंडेशनच्या वतीने जवानांसाठी राखी अशा प्रकारचे बॉक्स ठेवण्यात आले होते.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

स्वारद फाउंडेशनच्या वतीने हा अनोखा आणि देशभक्तीपर कार्यक्रम राबवला जात असल्याने अनेक सोसायट्यांमध्ये बॉक्स न जाताही ज्या-ज्या  सोसायटी पदाधिकारी लोकांना या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच संपर्क साधून देशाच्या जवानांसाठी उत्स्फूर्तपणे राख्यांचे संकलन करून दिले. निवडक दिवसांमध्येच २५००० राख्यांची संकलन करण्यात आल्याचे स्वराज फाउंडेशनच्या स्वातीवहिनी शरद मोहोळ यांनी सांगितले.