गुहागर: चिपळूण येथे झालेल्या अतिवृष्टीने व भीषण पुराने अक्षरशः चिपळूण परिसर झोडपून काढला होता ज्यात सर्वच वर्गातील जनतेची घर कोलमडून पडली अनेकांच्या शेती वाहून गेल्या, पाठीचा कणा अक्षरशः मोडला अश्या प्रसंगी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर (मुंबई व गाव शाखा) यांच्या वतीने चिपळूण व खेडमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.

सदर मदत गाव शाखेचे अध्यक्ष माजी सैनिक आयु. सुनिल जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला त्याचसोबत संघाचे विद्यमान सरचिटणीस आयु. संजय तांबे साहेब, गाव संघाचे कार्याध्यक्ष आयु. विश्वनाथ कदम साहेब, अध्यक्ष आयु. सुनिल जाधव साहेब, सरचिटणीस आयु. महेंद्र मोहिते साहेब आणि इतर गाव आणि मुंबई शाखेच्या पदाधिकारींच्या शुभहस्ते पोचरे गाव व इतर खेड्या-पाड्यात आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  शेवटची अंगारक विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; जाणून घ्या

सामाजिक बांधिलकी सांभाळणाऱ्या बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने आजवर जीवनावश्यक वस्तूंच्या व आर्थिक मदतीचे तीन वेळा वाटप झाले असून अजूनही अविरत मदतीचे कार्य संघाच्या वतीने होणार असून त्याचसोबत कोरोना व्हायरस कोव्हिड – १९ मुळे गुहागर तालुक्यातील ज्या कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्याने ज्यांची घर आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाली आहेत अश्या कुटूंबना ही आर्थिक मदत गाव व मुंबई शाखेच्या वतीने लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती सरचिटणीस आयु. संजय तांबे यांनी आमच्या वृत्तप्रतिनिधीना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.