माझ्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दिवसांपासून तहसीलदार ज्योती देवरे यांची जी क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की, तो त्यांनी केलेला केविलवाणा प्रयोग आहे. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्यावर काही गंभीर स्वरुपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत.

तसा अहवाल सुद्धा नाशिक विभागीय आयुक्त गमे साहेब यांनी मुंबईला पाठविलेला आहे. याआधी सुद्धा बरेच असे प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मला व्यक्‍तिगत स्वरुपात ज्या-ज्या वेळेस कामात गलथान कारभार झाला, असे वाटले तसेच ज्या-ज्या वेळी भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या.

त्यावेळेस मी त्यांना सुचित करण्याचा प्रयत्न केला. त्या-त्यावेळेस सुध्दा रात्री-अपरात्री मेसेज करुन त्यांनी सांगितले की, जर तुम्ही ह्या गोष्टी उघड केल्या तर मी आत्महत्या करेल. म्हणजे असे आत्तापर्यंत बरेच प्रकार झालेले आहेत. आणि ज्या विभागात त्या काम करतात, त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा त्या दोषी धरतात.

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक

आरडीसी असो, प्रांत असो, त्या विभागातील कर्मचारी असो, त्या सर्वांनाच. म्हणजे तुम्ही फक्त साधू-संतांप्रमाणे काम करतात आणि बाकीचे चुकीचे काम करतात, अस दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातोय.

परंतु, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्याची सखोलपणे चौकशी सुद्धा सुरु आहे. फक्त आता आपल्याला काहीतरी बचाव करण्यासाठी हा केलेला केविलवाणा प्रयोग आहे.

– आमदार नीलेश लंके, पारनेर विधानसभा मतदारसंघ.