पुणे: श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321व्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. परंतु, ब्राह्मण महासंघाकडून लालमहाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान 18 ऑगस्टला मिरवणूक काढण्यात आली.

त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दिक द्वंद्वामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातलं गेलं, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते. राज ठाकरे यांनीही शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या सगळ्यामुळे पुण्यातील राजकारण प्रचंड तापले आहे.

अधिक वाचा  शाळेची घंटा एक डिसेंबरपासून वाजणार....