पुणे : राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की, पत्रकार परिषद घेण्याचं विशेष कारण नाही. मात्र, या परिषदेत त्यांनी मुख्यत: जात, आरक्षण, देशाचा विकास आणि गेली ७४ वर्षातील भारत यावर आपली मते व्यक्त केली. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमधील वक्तव्यानंतर काही टीका त्यांच्यावर करण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचा खुलासा त्यांनी केला आहे. या मुलाखतीनंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता. त्याला राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

त्याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे यांनी म्हटलंय की, मी प्रबोधनकारांची पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत. मी जे बोललोय त्याच्याशी आणि माझ्या आजोबांचं काय संबंध आहे? असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी शरद पवारांना दिलं आहे.

त्यांनी आपल्या त्या वक्तव्याचा खुलासा करताना म्हटलंय की, १९९९ सालानंतर जातीपातींमधला द्वेष वाढला. राष्ट्रवादीच्या उदयानंतर हा द्वेष वाढला. दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर वाढाल. हे सगळ्यांनाच माहितीय. बोललो फक्त मी… या सगळ्याबबात राज ठाकरेंनी प्रबोधनकार वाचावेत, याचा अर्थच मला कळला नाहीये. मी आजोबांचं सगळं वाचलंय. त्यांचे काही संदर्भ हे त्या त्या काळातले आहेत.

अधिक वाचा  मुंबईच आर्थिक राजधानी राहणार कुणी कितीही स्वप्न पहा; नवाब मलिक हे म्हणाले

मला वाटतंय प्रबोधनाकारंच आवश्यक तेवढंच घ्यायचं आणि बाकी टाळायचं असंही करुन चालणार नाही, असंही उत्तर राज ठाकरेंनी शरद पवारांना दिलंय.

काय म्हणाले राज ठाकरे?

– निवडणुकांतील वार्डनिहाय आरक्षणामध्ये स्त्री-पुरुष इतकंच आरक्षण असायला हवं.

– नीरज चोप्रा मेडल जिंकल्यावर मराठा असल्याचं आठवलं.

– मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय, हे माझं मला, माझ्या पक्षाला आणि लोकांना माहितीय. मला मोजायचा प्रयत्न करु नये.

– पहिली गोष्ट प्रबोधनकार ठाकरे तुम्हालाही परवडणार नाहीत. प्रबोधनकारांना मध्ये आणयाचंच असेल तर तुम्हालाही ते परवडणारे नाहीत.

– चुकीचा इतिहास लिहला गेलाय तर खरा इतिहास सांगा ना काय लिहला गेलाय. ५० साली पहिली आवृत्ती लिहली गेलीय. तर आजवर खरा इतिहास का नाही समोर आला.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

– बाबासाहेब पुरंदरेकडे मी ब्राह्मण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो.

– पवारांच्या भेटीला जाताना मराठा म्हणून जात नाही.

– महाराष्ट्र जागा व्हावा, पुन्हा पुन्हा त्याच जातीच्या चिखलात राजकारण व्हावं, असं मला वाटत नाही. त्यातून बाहेर पडावं.