वाढदिवस असे म्हटले की सहजपणा वाटत असला तरी वृक्षांचा आणि तोही शेकडो वृक्षांचा १२ वा वाढदिवस म्हणजे तपश्चर्या निष्ठा आणि निसर्गप्रेम यांचा अनोखा संगम असल्याचे गौरव उद्गार खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी काढले निमित्त होते वारजे येथील प्रतिष्ठित अतुल नगर सोसायटीच्या प्रांगणात लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील 104 वृक्षांच्या बाराव्या वाढदिवसाचे!……. अकरावर्षापूर्वी नगरसेवक किरण बारटक्के यांनी तत्कालीन मनपा अतिरिक्त आयुक्त उमाकांतजी दांगट व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते अतुलनगर येथे वृक्षारोपण केले आणि स्थानिक नागरिक यांनी निष्ठाने या वृक्षांची जोपासना करून आज पन्नास ते सात फुटापर्यंत वाढ करण्यात निष्ठा दाखवली त्या गोष्टीची खरं कौतुक होण्याची गरज असून हे पुणे शहरासाठी एक स्तुत्य उपक्रम असून यांची प्रशंसा करण्याची गरज असल्याचेही तापकीर यांनी  सांगितले.

अधिक वाचा  राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका - फडणवीस

एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे सर्रास पणे केले जाते परंतु वृक्षांची जोपासना ही काळाची गरज असून बदलत्या हवामानानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबद्दल वाढत चाललेल्या जनजागृतीचे कौतुक सर्वस्तरातून करण्याची गरज आहे; आपण लोकप्रतिनिधी होतो याची भान ठेवून आपण केलेल्या कामाचा पाठपुरावा करत त्याची योग्य दिशा देण्याचे काम गेली दहा वर्ष माजी नगरसेवक किरण बारटक्के करत असून या भागातील स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य असून अशा जिव्हाळ्याच्या नात्याची गरज असल्याचेही यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकीर म्हणाले.

या प्रसंगी राजेशनाना काटे, बंडोपंत चिंतावर, सुधाकर मोडक, अजय खतदेव, डॅा प्रकाश पंधारे, एस आर पाटील सर, दिगंबर गुंडे, उमाकांत देशमुख, शिवराज भोसले, योगेश देशमुख, शिल्पाताई महाजनी, सविताताई राजाज्ञा, अनिल पवार, गोविंद जोशी, मनोज चितावर, संतोष तनपुरेसर, इ मान्यवर उपस्थित होते.