पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या वारजे माळवाडी भागात होय वारजे बदलतयं…… या अनोख्या आणि प्रेरणादायी टॅग लाईन खाली अनेक सोयी सुविधा सुरू असताना दिपाली प्रदिप धुमाळ विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका वनविभागाच्या 35 एकर जागेमध्ये भव्य संजिवन उद्यान नियोजित केले या अभिमानास्पद प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भूमिपूजन समारंभ होणार असून या प्रकल्पामुळे वारजे माळवाडी ला नवी ओळख निर्माण होण्यास मदतच होणार आहे.

वारजे माळवाडी परिसराचा विकास करण्यासाठी या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चारही नगरसेवक काम करत असताना अनेक वेगवेगळ्या कल्पना केल्या जात आहेत त्यामुळे वारजे माळवाडीला नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचा सर्व मजे करांना अभिमान वाटणार आहे.

अधिक वाचा  शिंदे सरकारचा ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार, हे 18 आमदार झाले मंत्री

यावेळी सुनिलजी तटकरे खासदार, रायगड, . ना. दत्तात्रय भरणे वन राज्यमंत्री, प्रशांतदादा जगताप शहराध्यक्ष, रा.कॉ. पुणे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे यांच्यासह पुणे शहरातील  मान्यवर मा. मुरलीधर मोहोळ महापौर, पुणे मा. वंदनाताई चव्हाण- खासदार, राज्यसभा पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थितीत म्हणून मा. सुजय दोडल मुख्य वनसंरक्षक, पुणे विभाग, मा. भिमराव तापकीर आमदार, . राहल पाटील उपवनसंरक्षक वनविभाग, लक्ष्मी दुधाने नगरसेविका मा. सचिन दोडके नगरसेवक, मा. दिलीप बराटे नगरसेवक, मा. विक्रम कुमार आयुक्त, पुणे मनपा, रूपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष, रा.म.काँ., मा. सायली वांजळे नगरसेविका मा. कुणाल खेमनार अति. आयुक्त, पुणे मनपा वर उपस्थित राहणार असल्याचे प्रदीप उर्फ बाबा धुमाळ मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ / नगरसेवक, पुणे मनपा यांच्यावतीने स्थानिक पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.