पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वारजे माळवाडी चा समावेश होण्याअगोदर या भागातील या खिंडीला एका अनोख्या वेगळ्या नावाने ओळखले जात होते परंतु संजीवन उद्यानाच्या भूमिपूजन आणि या वारजे खिंडीची ओळख बदलली जाणार असून संजीवन उद्यान हे कोथरूड आणि वारजे भागातील लाखो रहिवासी यांच्यासाठी ऑक्सीजन पार्क होणार असून त्यानंतर अभिमानाने आपल्याला होय वारजे बदलतयं…… असे म्हणता येईल असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडले. ते महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदिप धुमाळ यांच्या प्रयत्नाने करण्यात आलेल्या वनविभागाच्या 35 एकर जागेतील भव्य संजिवन उद्यान भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी दत्तात्रय भरणे वन राज्यमंत्री, प्रशांतदादा जगताप शहराध्यक्ष, रा.कॉ. पुणे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, नगरसेवक सचिन दोडके नगरसेवक दिलीप बराटे, सुजय दोडल मुख्य वनसंरक्षक, पुणे विभाग राहल पाटील उपवनसंरक्षक वनविभाग, मा. विक्रम कुमार आयुक्त, पुणे मनपा, कुणाल खेमनार अति. आयुक्त, पुणे मनपा उपस्थितीत अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ करण्यात आला.

अधिक वाचा  अमेरिकेत कोरोना उच्छाद : शाळा उघडल्याने मुलांचा वाढता आकडा

पुणे शहर विकसित होत असताना आपणाला कायमच नैसर्गिक समतोल राखण्याचा काम करावे लागणार आहे. पुणे शहर तंत्रज्ञानामध्ये विकसित होत असताना नैसर्गिक समतोल राखण्याचे काम करण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे काम वतीने करण्यात येत असल्यानेच पक्षाचे अनेक नगरसेवकांनी मार्फत नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल राखण्यासाठी उद्याने आणि तत्सम नैसर्गिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेला हा उपक्रमही यामध्ये भर टाकणार आहे. सुरुवातीच्या काळात या डोंगरावरती ज्या विदेशी वृक्षांची लागवड केली होती याचा सध्याच्या काळात कोणताही फायदा होत नसल्याने या वृक्षांच्या जागेवरती आता देशी वृक्षाची लागवड केल्यानंतर या परिसरातील हवा शुद्धीकरणासाठी याचा चांगला उपयोग होणार असून एक आदर्शवत उद्यान तयार करण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या.

अधिक वाचा  ओमिक्रॉन व्हेरिएंट: प्राथमिक शाळा 1 डिसें लाच सुरू होणार- टोपे

वारजे माळवाडी परिसराचा विकास करण्यासाठी या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक काम करत असताना अनेक वेगवेगळ्या कल्पना अवलंबत असल्याने पुणे शहरात वारजे एक नवी ओळख तयार करत आहे. संजीवन उद्यानाच्या माध्यमाने वारजे माळवाडीला नवी ओळख निर्माण झाली असून याला नागरी सहभागाची गरज असल्याने स्थानिक नागरिकांनी ही सहभागी होण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भजन भजन गायनाच्या आयोजन केलेले करण्यात आले होते तर कार्यक्रमाची सांगता मंगलमयी सुरेल अशा पसायदानाच्या गायनाने करण्यात आली.