बावधन – मेघमल्हार सोसायटी, रिद्धी- सिद्धी सोसायटी येथील लक्ष्मीदत्त चौक येथे अनेक दिवसांपासून पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन येथे वाहतूक कोंडी देखील होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नाने पावसाळी लाईन टाकण्याच्या कामास परिसरातील नागरिकांच्या उपस्तिथीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे.

बावधन- कोथरूड प्रभाग क्र१० मध्ये रस्त्याची कामे करत असताना नदी लगत असलेल्या तीव्र उतारामुळे या भागात पावसाळी लाईन टाकण्यात आली नव्हती. पावसाळ्याचे दिवस असताना या भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचण्याचे प्रकार घडले त्यावर काही नवाख्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु या भागातील लोकांना कायमची त्रासातून मुक्तता करण्यासाठी आज नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या हस्ते बावधन मधील लक्ष्मीदत्त चौक ते एलएमडी चौक, मेघमल्हार सोसायटी, रिद्धी सिद्धी सोसायटी, युनिकस सोसायटी, सॅफरॉन अव्हेन्यू, लक्ष्मीदत्त सोसायटी, रामनदी सोसायटी या परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला व आज या पाठपुराव्याला यश आले असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून येथे पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.